दत्ता फुगे खूनप्रकरणी 9 आरोपींना 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
पुणे, दि. 17 - गोल्डमॅन दत्ता फुगे यांचा खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व 9 आरोपींना 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश खडकी न्यायालयाने आज (शनिवारी) दिले. त्यांना आज कोर्टात हजर केले असता न्यायालयाने वरील निर्णय दिला. यावेळी न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती.
पोलिसांनी मुख्य सूत्रधार अतुल मोहिते याच्यासह 9 आरोपींना अटक केली आहे. दत्ता फुगे यांचा गुरुवारी रात्री दगडाने ठेचून दिघी येथील भारतमातानगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी काल (शुक्रवारी) आणखी चार आरोपींना अटक केली असून अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे.
अतुल ऊर्फ बल्ली कैलास पठारे (वय-24, रा. म्हस्के वस्ती, आळंदी रोड), शैलेश सुर्यकांत वाळके (वय-26, रा. यमाईनगर, दिघी), विशाल दत्ता पारखे (वय-32, रा. विश्रांतवाडी), निवृत्ती ऊर्फ बाळू किसन वाळके (वय-45, विठ्ठल मंदिराजवळ दिघी), प्रेम ऊर्फ कक्का ऊर्फ प्रमोद संताराम ढोलपुरीया (वय-23, रा. रामनगर, बोपखेल), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या खुनाचा मुख्य सूत्रधार अतुल अमृत मोहिते (वय 25), शौकत मुनीर आत्तार (वय 24), सुशांत जालिंदर पवार (वय 20), तुषार कान्हु जाधव (वय 20, रा. सर्व रा. भारतमाता नगर, दिघी) यांना रात्री उशीरा पोलिसांनी गजाआड केले. याप्रकरणी दत्तात्रय फुगे यांचा मुलगा शुभम फुगे (वय21, रा. भोसरी) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रात्री नऊच्या सुमारास भोसरी येथील राहत्या घरातून फुगे यांना चार ते पाचजणांनी बळजबरीने नेले होते, अशी माहिती त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका सीमा फुगे यांनी पोलिसांना दिली. दिघीच्या भारतमातानगरमध्ये रात्री बाराच्या सुमारास फुगे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले तसेच दगड घालून डोक्याचा चेंदामेंदा करून हल्लेखोर पसार झाले. दरम्यान घटनास्थळावर पोलिसांना कोयता मिळाला आहे.
फुगे हे खासगी सावकारीचा व्यवसाय करीत असत. भोसरी येथे वक्रतुंड चिटफंड फंडच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करून तसेच व्याजाने पैसे देऊन अनेकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर काही गुन्हे देखील दाखल आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी हल्लेखोरांबरोबर फुगे यांचे पैशांवरून भांडण झाले होते, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
दत्ता फुगे यांच्या पत्नी सीमा फुगे या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर त्या निवडून आल्या होत्या. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. दत्ता फुगे हे स्वतः शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते.
अंगावर सोन्याचे दागिने घालण्याच्या हौसेमुळे ते पिंपरीचे गोल्डमॅन म्हणून ओळखले जात. सुमारे साडेतीन किलो सोन्याचा शर्ट बनवून त्यांनी विश्वविक्रम नोंदविल्याने ते एकदम प्रसिद्धीझोतात आले होते. सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव वादग्रस्त ठरलेल्या फुगे यांना काही महिन्यापूर्वी पोलिसांनी तडीपारीची नोटीसही बजावली होती.