Breaking News

ऑलिम्पिक पदक हेच ध्येय : सानिया

नवी दिल्ली, दि. 16 - ऑलिम्पिक पदक हेच पुढील ध्येय आहे.  असा विश्‍वास जगातील अव्वल महिला दुहेरी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने व्यक्त केला. “यंदा  आम्ही अत्यंत सकारात्मक आहोत तसेच आमची टीम सर्वोत्तम आहे,’’ असेही सानिया म्हणाली.
चार वर्षांपुर्वी लंडन ऑॅलिम्पिकच्यावेळी उद्भ्वलेल्या वादाकडे लक्ष वेधताना सानिया म्हणाली, “त्यावेळी परिस्थिती खरंच वाईट होती. एक मोठा वाद उफाळल्याने  सर्वकाही व्यवस्थित नव्हते. आम्ही योग्य विचाराने सहभाग होऊ शकले नाही. मात्र, यावेळी असे काहीहि नसल्याने प्रत्येकाचे लक्ष्य निश्‍चित आहे.