Breaking News

विजेंदरचा कॅरी होपला नॉकऑट

नवी दिल्ली, दि. 17 - घरच्या प्रेक्षकांसमोर मोठ्या आत्मविश्‍वासाने उतरणार्‍या भारताच्या विजेंदरसिंगने व्यावसायिक बॉक्सिंग लढतीत कारकिर्दीमधील सर्वोत्तम  कामगिरी करताना सुपर मिडलवेट गटातील आशियाई किताब‘ बेल्ट पटकावला. त्याने प्रतिस्पर्धी केरी होपच्या आशा संयमी खेळाने उद्ध्वस्त केल्या.
विजेंदरच्या तुलनेत अनुभवी असणार्‍या केरीने घरच्या मैदानावर विजेंदरला पराभूत करण्याचे वक्तव्य केले होते. प्रत्यक्षात आज विजेंदरने आपल्या संयमी खेळाचा  नमूद पेश करीत कॅरी होपचा पराभव केला. दहा फेर्‍यांच्या लढतीत विजेंदरने तीनही जज्जेसकडून 98-92, 98-92, 100-90 असा विजयी कौल मिळविला.