खडसे-दाऊद यांच्यात संभाषण नाही!
एटीएसकडून खडसेंना क्लीन चीट
मुंबई, दि. 19 - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी झालेला फोनकॉल, प्रकरणी आरोपांची मालिका सुरू झाल्यामुळे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ’दाऊन फोनकॉल’प्रकरणी एटीएसने खडसेंना क्लीन चीट दिल्याने त्यांना सोमवारी मोठा दिलासा मिळाला आहे.खडसे आणि दाऊद यांच्यात कोणतेही संभाषण झाले नव्हते, अ
शी माहिती महाराष्ट्र एटीएसने मुंबई उच्च न्यायालयाला दिली. तसेच या कथित फोन कॉल प्रकरणाचा अहवाल सायबर सेलकडे सोपवणार असल्याचे देखील सांगितले. महाराष्ट्र एटीएसच्या या क्लीनचीटमुळे खडसेंना तूर्त दिलासा मिळाला आहे.दाऊदच्या कराची इथल्या घरातून खडसेंना संपर्क साधण्यात आला असल्याचा आरोप वडोदर्याचा हॅकर मनीष भंगाळे याने आरोप केला होता. या हॅकरने पाकिस्तानी दूरध्वनी कंपन्यांची संकेतस्थळे हॅक करुन ही माहिती मिळवल्याचा दावा केला होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलच तापले होते.
