‘आप’मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
नवी दिल्ली, दि. 19 - भारतीय जनता पक्षाने (भाजप) शिफारस केलेले राज्यसभा खासदार नवज्योतसिंह सिद्धू यांनी सोमवारी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सिद्धू यांनी अडीच महिन्यातच राजीनामा दिला आहे. सिद्धू हे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पुढील काही महिन्यात पंजाब विधानसभेसाठी निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिद्धू ‘आप’मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची पत्नी व भाजपाच्या पंजाबच्या आमदार नवज्योत कौर यांनीही आमदारपदाचा राजीनामा दिला आहे.दरम्यान, भाजपने लोकसभा निवडणुकीवेळी सिद्धू यांना डावलून अरुण जेटली यांना तिकीट दिले होते. तेंव्हापासून सिद्धू नाराज झाले होते.