Breaking News

झाकीर नाईकवर लवकरच बंदी येण्याची शक्यता !

नवी दिल्ली, दि. 10 - दहशतवाद्यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत, केंद्रसरकारकडून झाकीर नाईक च्या संदर्भात कठोर भूमिका घेतली असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेची नऊ पथके त्याशिवाय गुप्तचर यंत्रणा आणि अन्य तपास यंत्रणा झाकीर नाईकच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत. विशेष पथके त्याच्या भाषणाच्या चित्रफितींमधील शब्द न शब्द  तपासत आहेत. चार पथके फुटेज आणि भाषणांच्या सीडी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आली आहेत. तीन टीम्स सोशल साईटसवर लक्ष ठेऊन आहेत आणि दोन टीम्स नाईकच्या फेसबुक पोस्टवर लक्ष ठेऊन आहेत. प्राथमिक तपासात नाईकची भाषणे चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह असल्याचे समोर आले आहे.
त्याशिवाय त्याच्या संस्थेबद्दलही संशय निर्माण झाला आहे. झाकीर नाईकला समाजसेवेसाठी जो निधी मिळाला त्याचाही गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. फोन कॉल्स आणि ई-मेल शिवाय झाकीर नाईकच्या परदेश दौर्‍याचे प्रायोजकही एनआयएच्या रडावर आहेत. केंद्र सरकार यासंबंधी लवकरच कायदेशीर मत घेणार असून, त्यानंतरच नाईकवर बंदी घालण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.