Breaking News

मराठवाड्यात रोहयो कामांवर 60 हजार मजूर

औरंगाबाद, दि. 10 - मराठवाड्यात सध्या चांगला पाऊस असल्याने पेरण्यांना वेग आला आहे. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रोहयोवरील मजुरांची संख्या तब्बल 40 हजारांनी घटली आहे. तरीही सध्या रोहयोच्या 5154 कामांवर 60 हजार 578 मजूर काम करीत आहेत. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक 28 हजार मजूर आहेत. काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात मोठया प्रमाणात रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे रोहयोची कामे मोठया प्रमाणात सुरू करण्यात आली. या कामांवर अडीच लाखाहून अधिक मजूर काम करीत होते. बीड जिल्ह्यातच तब्बल 50 हजारांपेक्षा जास्त मजूर काम करीत होते.