शहरात उमटले कोपर्डी अत्याचार प्रकरणाचे पडसाद
नाशिक, दि. 19 - शहरात कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद उमटले. मराठा समाजाच्या संघटनांनी एकत्रित येत नाशिकच्या एमजीरोड भागात रास्ता रोको करून टायर जाळले.
मुलीवर आमनुष पणे बलात्कार करणार्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशा घटना परत घडू नये यासाठी कडक कायदे करावे, पीडित कुटुंबियांना 25 लाखांची सरकाने मदत करावी, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केले.
सलग वीस मिनटे आंदोलन सुरु असल्याने एमजीरोड भागात वाहतूक कोंडी झाली होती.