कोपर्डी अत्याचार प्रकरणी,नांदेड बंदला संमिश्र प्रतिसाद
नांदेड, दि. 22 - कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणी आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी. या मागणीसाठी संभाजी बिगेड,स्वाभिमानी संभाजी बिगेड,छावा, जिजाऊ बिगेडसह,विविध सामाजिक संघटनांच्यावतीने नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला.
शहरातील छत्रपती चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान या घटनेतील आरोपीना तत्काल अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, पी़िडत गस्त कुंटुंबास 50 लाखांची आर्थिक मदत करावी, व मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.