Breaking News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयास विद्यार्थ्यांनी ठोकले टाळे

नाशिक , दि. 22 - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी परिक्षेच्या निकालाबाबत वाढीव 10 गुण देणार असल्याचा विद्यापीठाचा निर्णय आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या  डोळ्यात धूळफेक करत असल्याचा आरोप करत विद्यार्थी कृती समितीच्या वतीने विद्यापीठाच्या नाशिक विभागीय कार्यालयास अध्यक्ष आकाश पगार यांनी टाळे  ठोकले.
विद्यार्थी कृती समितीच्यावतीने विभागीय समन्वयक रावसाहेब शिंदे यांना घेराव घालून त्यांच्या दालनात ठिय्या देऊन आंदोलन करण्यात आले होते. या ठिय्या  आंदोलनानंतर कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीनुसार विद्यार्थी संघटनांच्या तक्रारी व प्रत्यक्ष निकाल  यांची तपासणी करण्यासाठी विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य गजानन खराटे व डॉ. योगेश  नेरकर या 3 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती.