नगर शहर भक्तीरसात न्हाऊन निघाले
अहमदनगर (प्रतिनिधी)। 05 - श्रीक्षेत्र देवगडच्या शिस्तबध्द दिंडीचे रविवारी शहरात आगमन झाले. यावेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त हभप.भास्करगिरी महाराजाचे पोलिस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी यांनी स्वागत करुन दिंडीत सहभाग घेतला. तसेच तोफखानाच्या पोलिस निरीक्षक निकाळजे व महिलां दिंडीत सहभागी झाल्या होत्या.पोलिस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी यांनी टाळकरी होवून काही अंतर चालत गेले. हे पाहून दिंडीतील भक्त ही आनंदीत झाले. रविवारी शहरात वेगवेगळ्या ठिकाहून आलेल्या पालख्या व दिंडी येताच अधिकारी व नागरिकांनीही स्वागत केले. यामुळे संपुर्ण रविवार भक्तीरसात न्हावून निघाला होता. सायंकाळी 6 च्या सुमारास हभप. भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली असलेली पालखी व दिंडी कापडबाजारातून माणिक चौक मार्गे माळीवाड्यात जात असतांना कोतवाली पोलिस ठाण्याजवळ सोमनाथ मालकर , मुस्लिम समाजाचे उबेद शेख व मुस्लिम बांधवांनी वारंकर्याची सेवा प्रित्यार्थ स्वागत केले. त्यानंतर दिंडी टिळक रोडकडे मार्गस्थ झाली.
नेवासा तालुक्यातील देवगड येथील शिस्तबद्ध दिंडीचे नगर तालुक्याच्या वतीने पोखर्डी येथे यशवंत ऑटो शहर बस सेवेतर्फे स्वागत करण्यात आले.
संचालक सुर्यकांत गाडे, लता गाडे यांनी पालखीचे पुजन केले तर युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गाडे, माधुरी गाडे यांनी ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांना पोषाख व श्रीफळ देवुन सत्कार केला. वारकर्यांना पेढ्याचा प्रसाद देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी तुषार सोनवणे, रावसाहेब काकडे, प्रविण भालेकर, जितेंद्र गाडे, चैतन्य गाडे, रोहिदास कोरके, नाना चौरे, संजय धाडगे, दत्तात्रय धाडगे आदिंसह यशवंत ऑटो परिवार उपस्थित होता.
पोलीस यंत्रणेवर सर्वच उत्सवांचा ताण असतो गणपती, नवरात्र, दहिहंडी आणखी उत्सवांमध्ये पोलीसांना सर्वांचे रक्षण कराण्याची जबाबदारीच असते दिंडी सोहळ्यांमध्येही वारकर्यांना सुरक्षेची हमी देत एक सेवाच घडते या सेवेतच आम्ही पोलीस मित्र पांडुरंगाचे दर्शन मानतो असे प्रतिपादन तोफखाना पो.स्टे.चे पो.नि.निकाळजे यांनी केले.
नगर औरंगाबादरोडवरील डी.एस.पी.चौकात सामाजिक कार्यकर्त्या सौ.रजनी दत्तात्रय ताठे यांनी त्र्यंबकेश्वर येथील वडांगळीकर दिंडीचे स्वागत करुन वारकर्यांना भोजन दिले. यावेळी या उपक्रमाबद्दल निकाळजे यांनी समाधान व्यक्त करुन वारकर्यांना वाहतुकीचे नियम सांगितले. रस्त्यालगत दुपारची विश्रांती न घेता रोड पासून खाली लांबवर थांबुन विश्राती घेत जा मोठी वाहने कशी वेगात येतात अन जातात ते समजत नाही.यामुळे अपघाताची शक्यता असते.
यावेळी ह.भ.प. केदारनाथ महाराज पवार, पोपट सईद, रामदास खुुळे, पंडीत खुळे, आदिती पो.नि.निकाळजे यांचा सत्कार केला. रजनी ताठे यांनी आभार मानले.