कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
अहमदनगर (प्रतिनिधी)। 05 - नागापूर एमआयडीसीमधील बंद पडलेले कारखाने सुरु करा, एमआयडीसी भुखंड घोटाळ्यातील प्लॉट त्वरित ताब्यात घ्या, उच्च न्यायालयातील जनहित याचिका 68/2013 ची अंमलबजावणी त्वरित करा, अशी मागणी करीत कामगार संघटना महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना निवदेन देण्यात आले आहे.
या आंदोलनामध्ये कामगार संघटना महासंघाचे कॉ. बहिरनाथ वाकळे, मेहबुब सय्यद, संजय खामकर, महादेव पालवे, लहु लोणकर, रामदास वागस्कर, योगेश कोठारी, बबन लोखंडे, सुरेश रासकर, पांडुरंग काजककर, संतोष त्रिंबके, बाळासाहेब कदम, राजेंद्र डोईफोडे, अमोल पळसकर, आकाश साठे, सतीश निमसे यांनी सहभाग घेतला.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागापूर एमआयडीसीमध्ये 2012-13 पासून भुखंड घोटाळा सुरु आहे. शेतकरी व कामगारांच्या हक्काच्या ओपन स्पेस व अँमेनीटी स्पेस काही भुखंड तस्कारांनी एमआयडीसीच्या अधिकार्यांना हाताशी धरुन बेकायदेशीर कृत्य केले आहे. या गैरकारभाराविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल होवून त्याबाबत नुकताच निकाल दिला गेला आहे.