विषारी दारूमुळे उ. प्रदेशात 17 बळी
एटा, दि. 17 - उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील अलीगंज येथे विषारी दारु प्यायल्यामुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 21 जण प्रकृती गंभीर आहे.
विषारी दारुमुळे नागरिकांचा बळी गेल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून दोषींना अटक करण्यासाठी आंदोलन केले. पोलिस अधिकार्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देत नागरिकांचा राग शांत केला. या प्रकरणी दारुविक्रेता श्रीपालला अटक करण्यात आली आहे. तर, उत्पादनशुल्क अधिकारी, अलीगंजचे सीओ, एसओ यांच्यासह 11 अधिकारी आणि पोलिस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे.