मंत्रिमंडळाचा विस्तार,उद्धव ठाकरे गैरहजर
मुंबई, दि. 08 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. सहा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. तर पाच राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये शुक्रवारी सकाळी हा शपथविधी सोहळा पार पडला.
भाजपच्या सहा, शिवसेनेचे दोन तर मित्रपक्षाच्या दोन मंत्र्यांचा सहभाग आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मात्र गैरहजर राहिले.
मंत्रिमंडळात जयकुमार रावळ, सुभाष देशमुख, मदन येरावार, संभाजीराव निलंगेकर, रवींद्र चव्हाण, पांडुरंग फुंडकर, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांचा समावेश करण्यात आला असून त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
महादेव जानकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली असून राम शिंदे यांनादेखील प्रमोशन देत कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. यांच्यासोबतच संभाजी निलंगेकर, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, पांडुरंग फुंडकर यांनीदेखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.