Breaking News

काँग्रेसचा बुलंद आवाज आज विधान परिषदेत

मुंबई, दि. 08 - आपल्या अभ्यासपूर्ण आणि आक्रमक भाषाशैलीने महाराष्ट्राच्या राजकारणात एक तगडे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे मुत्सद्दी राजकारणी,  कोकण विकासाचे शिल्पकार, काँग्रेसचा बुलंद आवाज, राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आज शुक्रवारी संपन्न होत असलेल्या विधान परिषदेच्या विशेष  अधिवेशनात सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. राज्य विधान परिषदेच्या सभागृहात हा शपथविधी होईल. श्री. नारायण राणे यांची परिषदेवर बिनविरोध निवड  झाल्यापासून त्यांच्यावर अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव होत असून, राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्ते या लोकनेत्यांचे अभिनंदन करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
राज्यातील फडणवीस सरकारच्या कारभाराच्या चिंधडया उडवण्यासाठी सभागृहात नारायण राणे असायलाच हवेत, अशी इच्छा अनेकांकडून व्यक्त केली जात होती.  खुद्द सत्ताधारी पक्षातील मंत्री, राज्यमंत्री तसेच आमदारही अनेक वेळा विरोधी पक्षात नारायण राणे असते तर विधिमंडळात विरोधकांचे वेगळेच चित्र दिसले असते असे  बोलत असत. खुद्द काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी श्री. राणे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतरच विरोधकांच्या छातीत धडकी भरली होती.  प्रभावी नेतृत्व, महाराष्ट्रातील घडामोडींचा सखोल अभ्यास असलेले कोकणाचे सुपुत्र नारायण राणे आज सदस्यत्वाची शपथ घेणार असल्यामुळे काँग्रेसचा हा बुलंद  आवाज विधान परिषदेत सक्रिय होणार आहेत.