हिट अँड रन प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात
नवी दिल्ली, दि. 05 - अभिनेता सलमान खान याची 2002 मधील हिट अँड रन प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दाखल करुन घेतली. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून ऑन मेरिट‘ सुनावणी करण्यास सलामन खान याची मान्यता आहे काय, अशी विचारणा अखेरच्या दिवशी आम्हाला करण्यात आली होती. सलमान खान यांनी यास मान्यता दर्शविल्याची माहिती न्यायालयास देण्यात आली आहे. तेव्हा या प्रकरणाची अंतिम सुनावणी योग्य वेळी होईल,“ असे खान याचे वकिल आनंद देसाई यांनी सांगितले. या प्रकरणी 13 वर्षांपासून सत्र न्यायालयात सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू होता. सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. सलमान याची मुंबई उच्च न्यायालयाने 2002 मधील हिट अँड रन प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक‘ पद्धतीनुसार करण्यास न्यायाधीश जगदीश सिंग खेहर आणि न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने मान्यता दिली नव्हती.
