Breaking News

बॉम्बे हायकोर्टाचे आता मुंबई हायकोर्ट !

कलकता,मद्रास हायकोर्टाच्या नावात सुध्दा बदल
केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, दि. 05 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यात बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. मुंबई बरोबरच कलकता हायकोर्टाचे कोलकाता हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्टाचे चेन्नई हायकोर्ट असे नाव बदलायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामु
ळे यापुढे बॉम्बे हायकोर्ट आणि मुंबई हायकोर्ट म्हणून ओळखले जाईल.
1995 साली बॉम्बे शहराचे मुंबई असे नामकरण झाले होते, पण त्यानंतरही बॉम्बे हायकोर्टाच्या नावात बदल झाला नाही. बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करावे अशी शिवसेनेची मागणी होती. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे युती सरकार 1995 मध्ये पहिल्यांदा सत्तेवर आले त्यावेळी बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई असे नामकरण झाले. दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या मुद्यावर केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांचीही भेट घेतली होती. बॉम्बे आता मुंबई म्हणून ओळखली जाते. त्यामुळे सरकारी संस्थांना जुनी नावे नको असे सावंत म्हणाले होते. आयआयटी-बॉम्बेच्या नावातही मुंबईचा समावेश करावा अशी शिवसेनेची मागणी आहे.