Breaking News

बीएचआर पतसंस्थेत 1100 कोटींच्या ठेवी अडकल्याचा अंदाज

जळगाव, दि. 17 - येथील भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेच्या राज्यभरात 264 शाखा उघडून त्या माध्यमातून लोकांना 13 टक्के व्याजाचे  आमिष दाखवून संचालक मंडळाने तब्बल अकराशे कोटींचा अपहार केल्याचे समोर आले आहे. यात पतसंस्थेच्या जंगम व स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.
या अपहारासंदर्भात महाराष्ट्रभर पतसंस्थेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात सुरूवातीला चेअरमन प्रमोद रायसोनी यांच्यासह 13 संचालक ताब्यात  घेण्यात आले होते. आता महिला संचालकासहदेखील सीआयडीच्या पथकाने न्यायालयाच्या परवानगीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. बीएचआर  पतसंस्थेवर वीस संचालकांची नियु
क्ती करण्यात आली होती.