भारतीय वायू दलाचे विमान बेपत्ता
नवी दिल्ली, दि. 23 - भारतीय वायू दलाचे एएन-32 हे मालवाहतूक करणारे विमान बेपत्ता झाले आहे. या विमानात 29 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या विमानाशी संपर्क तुटला.
चेन्नई तांबरामहून पोर्ट ब्लेअर येथे हे विमान जात होते. सकाळी 7.30 च्या सुमारास या विमानाने उड्डाण केल्याची माहिती आहे. सकाळी 7.46 वाजता या विमानाशी संपर्क झाला होता. 8.12 मिनिटांनी हे विमान शेवटचे रडारवर दिसले होते.