अलमट्टी धरणाचे 26 दरवाजे उघडले
सोलापूर, दि. 23 - पश्चिम घाटात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कृष्णा, घटप्रभा, कोयना, पंचगंगा, हिरण्यकेशी, वेदगंगा, दूधगंगा आणि त्यांच्या उपनद्यांनी कृष्णेच्या प्रमुख प्रवाहात प्रतिदिन हजारो क्युसेक्स पाणी जमा झाले आहे. मंगळवारी रात्री उशिरा हे धरण काठोकाठ भरले असून; सावधानीचा उपाय म्हणून प्रशासनाने धरणाचे 26 दरवाजे उघडले आहेत.
कृष्णा नदीवरील सर्वात मोठे धरण असलेल्या अलमट्टी धरणाची पाणी पातळी काठोकाठ भरली असून; या वर्षी हे धरण अपेक्षेपूर्वीच भरल्याची माहिती कर्नाटकच्या ‘कृष्णा भाग्यजल निगम मंडळा’च्या प्रमुख अभियंत्यांनी बुधवारी दिली.
मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने हे धरण भरले नव्हते. प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुस-या किंवा तिस-या आठवडयात हे धरण भरते; परंतु या वर्षी जुलै महिन्यापूर्वीच धरणाच्या पातळीने विक्रम केला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात झालेल्या मुसळधार पावसामुळे अलमट्टी आणि त्यापुढील नारायणपूर ही दोन्ही धरणे लवकर भरली आहेत.