किर्ती आयुर्वेदिक पंचकर्म व संपूर्ण उपचार सेंटर रुग्णांच्या सेवेत रुजू श्री.लालचंदजी रुणवाल यांच्या हस्ते शुभारंभ
जालना, दि. 18 - किर्ती आयुर्वेदिक पंचकर्म व संपूर्ण उपचार सेंटरचा शुभारंभ आज रविवार श्री. लालचंदजी रुणवाल यांच्या शुभहस्ते करण्यात आला. येथील संभाजीनगर परिसरातील भोकरदन रोडवर नव्या स्वरुपात आणि प्रशस्त अशा ठिकाणी हे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे.
शुभारंभ प्रसंगी शहरातील मान्यवर डॉक्टर्स, वकील यांच्यासह प्रतिष्ठीत मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत किर्ती आयुर्वेदिक पंचकर्म व संपूर्ण उपचार सेंटर च्या संचालिका डॉ. किर्ती रुणवाल आणि अॅड. नितीन रुणवाल केले. या हॉस्पीटलमध्ये आयुर्वेदिक पंचकर्म उपचार पध्दतीमध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात येणार असून जवळपास बहुतांशी आजारावर या ठिकाणी उपचार करण्यात येणार असल्याने त्याचा फायदा रुग्णांना होण्यास फार मोठी मदत आहे. किर्ती आयुर्वेदिक पंचकर्म व संपूर्ण उपचार सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे सेंटर नावारुपाला तर येईलच परंतू येथे उपचार घेतलेल्या रुग्णांच्या चेर्हयावर आपल्याला आनंद पाहयचा आहे. रुग्णांचे समाधान होईल, रुग्ण बरा होईल यातच आपले देखील समाधान आहे, असे मत शुभारंभ प्रसंगी डॉ. किर्ती रुणवाल यांनी व्यक्त केले.