कण्हेर धरणात ‘मगर’; सह्याद्री प्रकल्पात ‘अजगर’
सातारा, दि. 18 - कण्हेर धरण परिसरात आज (रविवार) सकाळी नऊच्या सुमारास ग्रामस्थांना मगर आढळली. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वनविभागास दिली. वनक्षेत्रपालांनी मगरीला पकडून पुण्याला रवाना केले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ढाणकल गावात सुमारे पाच दिवसांपासून जखमी अवस्थेत पडलेले साडेदहा फूट लांबीचा अजगर वन विभागाला सापडला. येथील लघुपशुचिकित्सालयात अजगरावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, वन्यजीव विभागाच्या निरीक्षणाखाली त्याला ठेवण्यात आले आहे.
मगर पाहण्यास कण्हेर धरण रस्त्यावर मोठ्या संख्येने ग्रामस्थांची गर्दी झाली होती. यावेळी वेण्णा नगरचा एक युवक जखमी झाला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत असणार्या बफर झोनमधील ढाणकल गावातील रस्त्याकडेला हा अजगर सुमारे पाच दिवसांपासून पडल्याचे ग्रामस्थांना दिसले. ग्रामस्थांनी भीतीने त्याची माहिती हेळवाकचे वनक्षेत्रपाल देवकर यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन अजगराची पाहणी केली. त्या वेळी अजगराच्या जबड्याला जखम झाल्याचे लक्षात आले. अजगराला त्यांनी ताब्यात घेतले. विभागीय वन अधिकारी मिलिंद पंडितराव, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना त्याची माहिती दिली. त्यानुसार अजगराला उपचासाठी भाटे यांच्याकडे देण्यात दिले. भाटे व सहकारी चेतन सूर्यवंशी, गिरीश शहा यांनी त्याला उपचारासाठी येथील लघुपशुचिकित्सालयात आणले. तेथे डॉ. परिहार यांनी अजगरावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्याला खाद्य देऊन वन्यजीव विभागाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या अजगराचे वजन सुमारे 15 किलो असल्याचे वन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.