Breaking News

कांदा व्यापारी आणि बाजार समिती सभापतींची बैठक तोडग्याविना संपली

नाशिक दि. 18 - जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी आणि बाजार समिती सभापतींची बैठक आयोजीत करण्यात आली होती. पण बैठकीत  कुठलाही तोडगा निघाला नाही. आता पुन्हा एकदा या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी मुंबईत पणन मंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील कांद्याचे व्यापारी नियमनमुक्ती निर्णय विरोधात संपावर गेले आहेत. आडत देण्यास व्यापर्‍यांनी तीवˆ विरोध केल्याने याच  प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समितिचे सभापती आणि व्यापारी यांची बैठक झाली.
 पण बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. आता पुन्हा एक
दा या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी मुंबईत पणन मंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. या  चर्चेनंतर संपाबाबत निर्णय घेण्यात येईल असे व्यापारी संघाकडून सांगण्यात आले आहे. एकूणच गेल्या काही दिवसापासून कांद्याचे व्यवहार ठप्प झाल्याने  शेतकर्‍यांचे अडचणी वाढल्या आहेत.