सोलनपाडा डॅमवर पर्यटकांना बंदी
रायगड, दि. 19 - कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. मात्र या धबधब्यावर येणारे पर्यटक परिसरात मद्य प्राशन करुन धिंगाणा घालतात. तर तोकड्या कपड्यात वावरणार्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींमुळे लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. त्यामुळे सोलनपाडा धबधब्यावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
मागील वर्षी नावारुपाला आलेल्या कर्जत तालुक्यातील सोलनपाडा या बंधारा वजा धबधब्यावर दर आठवड्याला किमान दहा हजार पर्यटक येतात. अतिशय मनमोहक अशा या ठिकाणी येणारे पर्यटक फार मोठ्या प्रमाणावर मद्य प्राशन करून धींगाणा घालतात. अनेक अल्पवयीन शाळा कॉलेज मधील मुले, मूली आणि पर्यटक अतिशय तोकड्या कपड्यात सभ्य पणाच्या सर्व मर्यादा ओलांडून डॅमच्या पाण्यात किंवा आजु बाजूच्या झुडपात नको ते चाळे करीत असतात.