बंद हॉटेलमध्ये हत्या झालेल्या तरुणाची ओळख पटली
औरंगाबाद, दि. 19 - एका 30 वर्षीय व्यक्तीचे तोंड व हात चिकटपट्टीने घट्ट चिकटवून, डोक्यात गोळी झाडून खून करण्यात आल्याचा प्रकार शिऊर जवळील हॉटेल साईप्रसादमध्ये उघडकीस आला होता. यातील खून झालेल्या व्यक्तीची ओळख सोमवारी पोलिसांना पटली आहे.
खून झालेला व्यक्ती हा बनारस येथील रहीवाशी असुन शिर्डी येथे साई मंदिराच्या बाजूला त्यांची प्रसादाची दुकान आहे. निशिकांत प्रभुनारायण पांडे (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा खून 65 लाख रूपयांच्या व्यवहारावरून आणि अनैतीक संबधातुन झाल्याची माहीती पोलीस सुत्रांनी दिली आहे.
वैजापूरऔरंगाबाद मार्गावरील शिऊर पासून तीन किमी अंतरावर असलेले हॉटेल साईप्रसाद हे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे. या बंद अवस्थेत असलेल्या हॉटेलचा फायदा घेत एका अनोळखी तीस वर्षीय इसमास अर्धनग्न करून त्याचे तोंड व हात चिकटपट्टीने घट्ट चिकटवून त्याची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.