Breaking News

कल्याण, डोंबिवली खड्डयात; रस्ते दुरुस्तीचे 6 कोटी पाण्यात

ठाणे, दि. 19 - पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी 6 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यासाठी महापालिकेने 4  कंत्राटदार कंपन्यांना ही कामे विभागून दिली आहेत. मात्र, ती निकष व नियमानुसार होत नाहीत. तसेच दुरुस्ती केलेले रस्ते पुन्हा उखडल्याने पैसे पाण्यात गेल्याचे  दिसत आहे.
काम न केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या अधिकार्‍याला कंत्राटदार वर्कआर्डर नसल्याचे सांगून वेठीस धरीत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघड झाला आहे.  त्यामुळे खड्डे योग्य प्रकारे बुजविले गेलेले नाहीत. परिणामी सहा कोटींची रक्कम पहिल्या पावसाच्या पाण्यात वाहून जाणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात  आहे. तर दूसरीकडे सभागृहात विरोधी बाकावर बसणार्‍या मनसेने याच खड्डयांच्या बाबतीत आक्रमक पावित्रा घेतला आहे.