डॉ. आंबेडकर स्मारकाचा आराखडा रखडला
मुंबई, दि. 05 - इंदू मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. या आराखडयानुसार बाबासाहेबांचा पुतळा कोणत्या दिशेने उभारावा, यावर अद्याप एकमत झाले नसल्याने हा आराखडा रखडण्याची चिन्हे आहेत.
दादरमधील इंदू मिलच्या 12 एकर जागेवर आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली होती. मात्र स्मारकाची घोषणा करून केंद्रातील भाजपा सरकारला दोन वर्षे झाल्यानंतरही स्मारकाचा आराखडाच पूर्ण करता आलेला नाही.
या आराखडयासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली आराखडा नियोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या समितीने स्मारक आराखडा अंतिम केला नसल्याने आंबेडकरी जनतेत फडणवीस सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे.
या संदर्भात सामाजिक न्यायमंत्री बडोले यांच्या अध्यक्षतेखाली आराखडा समितीची बैठक होणार होती. जवळपास आराखडा अंतिम टप्यात आला आहे, असे बडोले यांचे म्हणणे आहे.
मात्र, या आराखडयानुसार डॉ. आंबेडकरांचा पुतळा कोणत्या दिशेने उभा करावा या संदर्भात समितीत अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे बडोले जरी आराखडा अंतिम झाल्याचा दावा करत असले तरी बाबासाहेबांच्या पुतळयावरून पुन्हा हा आराखडा रखडण्याची चिन्हे आहेत. शिवाय बाबासाहेबांच्या पुतळयाची दिशा कोणती असावी यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.