शिक्षक सोसायटीच्या सभेत ‘गैरवर्तना’ची परंपरा कायम
। व्यासपीठावरच सत्ताधारी आणि विरोधक एकमेंकावर भिडले । गोंधळात माईकची तोडफोड करण्यात आली । भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सभा गाजली
अहमदनगर (प्रतिनिधी)। 05 - जिल्हा माध्यमिक सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत विरोधक संचालक व सभासदांनी अभ्यासपूर्ण मांडलेल्या प्रश्नांसमोर सत्ताधार्यांची अक्षरश: कोंडी झाली. सोसायटीतील गैरकारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी सत्ताधार्यांना थेट साडीचोळीसह पंचवस्त्रांची भेट देण्याचा प्रकार झाला. यापाठोपाठ काही सभासदांनी सत्ताधार्यांच्या कारभारावर ताशोरे ओढण्यासाठी गैरकारभाराचे गाठोडे घेऊनच सभेत प्रवेश केला. त्यामुळे सत्ताधारी संचालक व विरोधक समोरासमोर येऊन काहीकाळ तणाव निर्माण झाला. या सर्व प्रकारांमध्ये सभेसमोर असलेल्या तेरा विषयांपैकी फक्त दोनच विषयांवर चर्चा होऊन सभा आटोपती झाली.दरम्यान, शिक्षक सोसायटीच्या सभेत शिक्षकांनी गोंधळ घातल्याने शिक्षकीपेशाला पुन्हा कलंक लागला त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून गैरवर्तनाची परंपरा पुन्हा दिसून आली. शिक्षकांनीच शिक्षकांची अबु्र वेशीवर टागल्याचे दिसून आले. राज्यभर सभेचे हिडीस दर्शन घडले. याबाबत अनेकांनी शिक्षकाच्या भुमिकेबाबत संताप व्यक्त केला. सत्ताधार्यांनी विरोधकांचा हा प्रकार म्हणजे राईचा पर्वत करण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. विरोधकांनी यावर सत्ताधार्यांनी केलेल्या गैरकारभाराचे पुरावेच सभासदांसमोर ठेवल्याने त्यांचे पितळ उघडे पडल्याचा दावा केला आहे. माध्यमिक शिक्षक सोसायटीची 73 वी सभा सुर्यकांत डावखर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभा सुरु होण्यापुर्वीच परिवर्तन मंडळाच्या संचालक व कार्यकर्त्यांनी मागण्याचे फलक घेऊन घोषणाबाजी केली. सचिव वांढेकर यांनी मागिल सभेची इतिवृत्त वाचन केले.
माध्यमिक सोसायटीच्या सर्वसाधारण वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर गेल्या दिवसांपासून सत्ताधारी व विरोधकांमध्ये पत्रयुद्ध सुरू होते. विरोधकांनी आक्रमक होत अभ्यासपूर्ण आरोप केल्याने सत्ताधारी संचालक मंडळ काहीसे बॅकफूटला गेले होते. जागा खेरदी प्रकरण, लेखा परीक्षणाचे शुल्क, एनपीए, ऑनलाइनपद्धतीवर झालेला खर्च, रंगरंगोटी, लाभांश वाटप, रिझर्व्ह फंड, नोकर भरती, फर्निचरची विना निविदा खरेदी, जाहिरात खर्च, कृतज्ञता निधी, अहवालातील व्याकरण चुका, अकं चुका, बैठका व त्यावरील खर्चांवर आणि अपंगाना देण्यात येणार्या व्याजातील सवलतींच्या विषयांवर सभा चांगलीच गाजली.
सभेला सुरूवात होणार तेवढयात श्रीगोंदे येथील सोसायटीचे सभासद रामदास जंजिरे हे संचालकांच्या दिशेने धावले. तेथे त्यांनी पिशवीतून काही वस्त्र काढले. त्यात साडीचोळीसह पंचवस्त्रांचा मावेश होता. श्रीगोंदे येथील जमीन खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्यांनी हे पंचवस्त्र सत्ताधारी संचालक मंडळांना देऊन त्याचा निषेध केला. बँकेच्या रिझर्व्ह फंडातून ही जमीन खरेदी करू, अशा घोषणा दिल्या. जंजिरे यांच्या या प्रकारावरून सत्ताधारी व विरोधक समोरासमोर आले. एकमेकांना शिवराळ भाषेत सजविण्याचा प्रकार सुरू झाला. त्यात काही ज्येष्ठ सभासदांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केले. तेवढयात सभासद सुनील दानवे, तुषार शिंदे, नंदुकमार शितोळे व संतोष ठाणगे यांनी सत्ताधार्यांच्या गैरकारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी डोक्यावर गाठोडे घेऊन सभेत प्रवेश केला. या प्रकाराला सर्मथन म्हणून काही सभासदांनी सत्ताधार्यांच्या कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी टोप्या घातल्या. विरोधकांचा हा आक्रमकपणा पाहून सत्ताधारी पुरते मेटाकुटीला आले.
विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे हे सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते. विरोधक संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, बाळासाहबे राजळे, चांगदेवअध्यक्षांची चुप्पी बरच काही सांगून गेली!
सोसायटीचे अध्यक्ष सूर्यकांत डावखर हे मात्र चुप्पी साधून होते. काही विरोधकांनी अध्यक्ष डावखरे यांना चुप्पी तोडण्याचे खुले आव्हान दिले. पण डावखरे हे कचरे यांच्याकडे पाहून गप्प राहत होते. सत्ताधारी मंडळाच्या कारभार हा हुकूमशाहीपद्धतीचा असल्याचा हा सर्व प्रकार सभासदांपासून लपला असल्याचे विरोधकांनी यावेळी सांगण्याचा प्रयत्न केला.
खेमनर आणि शैला जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांसमोर सत्ताधारी संचालक मंडळाची वारंवार कोंडी होत होती. अपंगांना व्याजात देण्यात येणार्या सुटवर तत्काळ प्रस्ताव तयार करण्याचा विषय मंजूर झाला. रिझर्व्ह फंडाला धक्का न लावता सोसायटीच्या इमारतीच्या शाखांसाठी स्थावर मालमत्ता खरेदी केली जाईल, असे भाऊसाहेब कचरे यांनी स्पष्ट करताच विरोधकांनी त्यावर जल्लोष केला. राजेंद्र लांडे, तुषा शिंदे, मारूती लांडगे, अरविंद देशमुख, प्राचार्य सुनील पंडित, नंदकुमारस शितोळे व सुनील दानवे यांनी सत्ताधार्यांसमोर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सर्मपक असे उत्तर देता आली नाही. या गोंधळात सभेसमोर असलेल्या 13 विषयांपैकी फक्त दोन विषयांवर चर्चा झाली.
