हमाल पंचायतचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)। 05 - राज्यशासन सर्वच क्षेत्रात कष्टकरी आणि शेतकरी यांच्या हिताचा विचार न करता निर्णय घेत आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा आदी वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.
शेतकर्यांना वाट्टेल तेथे शेतमाल विक्रीस मोकळीक देण्यात येऊन आडत , हमाली, तोलाई, मार्केट सेस इत्यादी करातून सूट देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. आडत आणि सेस बाबतचा उपाय असा असूच शकत नाही त्याबाबत शेकड्याऐवजी नगावर तो घेता येईल का ?त्याबाबत विचारपूर्वक अभ्यास करुन निर्णय घेणे आवश्यक होते. हमाली, तोलाई ही नगावर असते. ती हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी तुटपुंजी असते. याबाबी लक्षात घेता शासनाला खरोखर शेतकरी हिताचा निर्णय घ्यायचाच असेल तर उत्पादन खर्चावर आधारीत शेतमालाला हमी भाव दिला पाहिजे. त्यासाठी स्वामीनाथन समितीच्या अहवालावर अंमलबाजवणी करण्याचे सोडून जुजबी निर्णय घेऊन हमाल-मापाडीच्या जीवनात माती कालवणारा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलन कर्त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला. घोषणामुळे परिसर दणाणून गेला होता. आंदोलन कर्त्याच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन दिले यावेळी कॉ.बाबा आरगडे, अॅड.लक्ष्मण वाडेकर,मधुकर केकाण,गोविंद सांगळे,बाळासाहेब वडागळे, बापुसाहेब बडे आदींसह 200 कार्यकर्ते उपस्थित होते.