Breaking News

धर्म दहशतवादाची शिकवण देत नाही : आमीर खान

मुंबई, दि. 07 - जगातील कोणताही धर्म दहशतवादाची शिकवण देत नसून, एखाद्या धर्माचा चुकीच्या पद्धतीने काही लोक चुकीचा प्रचार करत असल्याची खंत असे अभिनेता आमीर खान याने गुरुवारी व्यक्त केली आहे.
ईद निमित्त आमीर खानने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना तो म्हणाला, ‘कोणताही धर्म हा दहशतवाद शिकवत नाही. दहशतवाद आणि धर्माचा संबंध लावला जाऊ नये. मुस्लिम, हिंदू, शीख, ख्रिश्‍चन धर्मातील प्रत्येकजण आपल्या धर्मासाठी काहीतरी करत असतो. दहशतवादाशी त्यांचा काही संबंध नसतो. धर्म दहशतवाद शिकवत नाही. जे लोक दहशतवाद पसरवितात आणि जे लोक दहशतवाद करतात त्यांना धर्माशी काही देणे-घेणे नसते. मग ते कोणत्याही धर्माचे असो. जर त्यांनी धर्माचं खरोखर पालन केलं असते तर त्यांनी प्रेम शिकवले असते. बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणांच्या रडारावर डॉ. झाकिर नाईक यांच्याबाबत पत्रकारांनी प्रश्‍न विचारल्यानंतर आमीर म्हणाला, मला यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. मला जे काही बोलायचे होते ते मी बोललो आहे.