Breaking News

राजस्थानमध्ये अपघातात 13 जणांचा मृत्यू

जयपूर - 07 -  राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 40 हून अधिकजण जखमी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीलवाडा जिल्ह्यातील मावला गावाजवळ हा अपघात झाला. ट्रकने समोरून ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रॉलीतून प्रवास करणार्‍यांपैकी अनेक जणांचा मृत्यू झाला.