Breaking News

प्राचार्य कै. रामदासजी डांगे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त व्याखान कार्यक्रम उदघाटन उल्हासदादा पवार यांच्या हस्ते संपन्न

परभणी/प्रतिनिधी, दि. 10 -  परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने प्राचार्य कै. रामदासजी डांगे यांच्य द्वितीय पुण्यस्मरणदिनानिमित्त बी रघुनाथ सभागृह येथे दि. 8 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजता मा.माजी अध्यक्ष उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ, साहित्यिक मा. उल्हासदादा पवार यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलन करून उल्हासदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. इंद्रजीत भालेराव, माजी आ. सुरेशदादा देशमुख, महापौर सौ. संगिताताई वडकर,उपमहापौर भगवानराव वाघमारे, स्थायीसमिती सभापती गणेश देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम सुरू झाला.  उपमहापौर भगवान वाघमारे यांनी कै. प्राचार्य डांगे सर यांनी 1975 मध्ये शिवाजी कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून होते. मी त्यावेळेस विद्यार्थी होतो. त्यांनी मला 5 रूपयामध्ये अ‍ॅडमिशन दिले. मी त्यांच्या काळात विद्यार्थी होतो याचा मला अभिमान आहे. त्यामुळे परभणी महानगरपालिकेत सर्वसाधारण सभेमध्ये कै.प्राचार्य रामदासजी डांगे यांच्या स्मृतीदिनानिमित्त महानगर पालिकेच्या वतीने व्याख्यान घेण्यात यावे यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये मंजूरी घेतली. त्यासाठी बजेटही मंजूर करून घेतले.तसेच माजी खासदार शेषरावजी देशमुख यांचाही गौरव करून व्याख्यान घेण्यात यावे असे कार्यक्रम घेण्यावत यावे असे सांगीतले. महापौर सौ. संगिताताई वडकर, प्राचार्य रामदास डांगे यांच्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान घ्यावे असे सुचविले. मराठवाड्याचे भूषण ज्ञानेश्‍वरी ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे. भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यात यावा असे सुचविले. मनपाच्या वतीने निधी उपलब्ध करून दिला आहे. सुत्रसंचलन रमाकांत कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन ज्ञानोबा मुंढे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष धारासुरकर, प्रमोदवाकोडकर, प्रमोद  बल्लाळ, रमाकांत कुलकर्णी, प्रविण देशपांडे , भांडारपाल,श्रीपाद कुलकर्णी, मालमत्ता व्यवस्थापक साहेबराव पवार, प्रल्हाद देशमाने यांनी परिश्रम घेतले.