भारिप बहुजन महासंघ आंदोलनाच्या तयारीत
गंगाखेड/प्रतिनिधी, दि. 10 - संत जनाबाई महाविद्यालयातील 11 वी , 12 वी च्या विद्यार्थ्यांना पाली विषय देण्याच्या बाबतीत प्राचार्य डॉ. बी.एम. धुत व संस्थाचालक यांनी दुटप्पीपणाची भूमिका घेतली आहे. कागदोपत्री व प्रशासन स्तरावर माहीती देतांना महाविद्यालयात पाली विषय सुरु असुन विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले नाहीत असे दाखवून पाली विषयाचे प्राध्यापक प्रताप खैरे यांना काढुन टाकण्यासाठीचे कारस्थान वेगाने चालवन पाली विषय घेणार्या विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान करण्याचे महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेच्या मनात संतापाची ताट निर्माण झाली आहे.
संत जनाबाई महाविद्यालयात 2002 पासुन पाली विषय सुरु करण्यात आला पण तो गेल्या 15 वर्षापासुन कायम विना अनुदानीत तत्वावर ठेवण्यात आला आहे. या विषयाचे अध्यापक प्रताप खैरे यांनी विनामोबदला काम केले. शेवटी न्यायालयात धाव घेवून अन्यायाला वाचा फोडली. न्यायालयाने संस्थोला आदेश देत त्यांना 39 लाख रुपये वेतन देण्याचे सांगीतले याच गोष्टीचा राग मनात धरुन संस्थेने यावर्षी 2016-2017 च्या प्रवेश प्रक्रियेत माहिती पुस्तीकेतुन पाली विषयावर आळला पण प्रवेश समिती व प्रशासने विद्यार्थ्याना प्रेवश न देण्याचे षढयंत्र सुरु केले आहे. परिणामी दिनांक 08 जुलै रोजी भारतीय बौध्द महासभा पुज्य धम्मज्योत धम्म प्रसार मंडळ, व भारिपच्या पदाधिकारी व कार्यकत्याृंनी महाविद्यालयात जावून प्राचार्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण प्राचार्य डॉ. बजरंग धुत हे बाहेर गावी गेल्याचे सांगण्यात आले. प्राचार्यांच्या दालनात आलेल्या 30 ते 35 कार्यर्त्यांनी उप प्राचार्य डॉ. दयानंद उजलंबे यांना बोलावून घेतले व त्यांच्या सोबत चर्चा केली त्यांनही कोणतेही ठोस काम न करता पाली विषय सुरुच आहे, बंद केला नाही असाच सुरु आवळला उडवाउडवीचे उत्तरे दिली. संस्थेच्या वतीने कोणीही महाविद्यालयात आले नाही. त्यामुळ ेपाली विषयाच्या प्रवेशा संदर्भात विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्राचार्य, व संस्थाचालक फारसे गंभीर नसल्याचे दिसुन आले. यावेळी यशवंत भालेराव, राहुल गायकवाड, सुरेश साळवे, सत्यजित सावंत, सचिन कांबळे, बाळु जंगले, सत्यपाल साळवे, विजय साळवे, धम्मानद गायकवाड, बालाजी रायभाळे, विद्यानंद साळवे, प्रविण रायभोले, भानुदास कसबे, युवराज पंडीत, अरविंद पंडीत, महादेव सावळे, राहुल पुंबरे, अनिल वामन राठोड आदींनी उपस्थित राहुन महाविद्यालय प्रशासनास पाली विषयाच्या प्रवेश बंद संदर्भात जाब विचारला.