Breaking News

बुध्दीबळस्पर्धेत आर्यन दुधाटे जिल्ह्यात प्रथम

परभणी / प्रतिनिधी, दि. 14 -  दिनांक 09  व 10 जुलै 2016 रोजी मॉडेल इंग्लीश स्कुल परभणी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत 09 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक आर्यन रमेशराव दुधाटे ने तर व्दितीय क्रमांकावर भार्गव देशपांडे यांनी यश संपादन केले. विजेता दोन्ही खेळाडूंची औरंगाबदा येथे संपन्न होणार्‍या राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिनांक 09 व 10  जुलै रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धे आर्यन दुधाटे याने आपल्या प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्ध्यांवर आगेकुच करुन सामन्यामध्ये विजय प्राप्त केला. त्याला बुध्दीबळातील कौशल्य शिकवण्यासाठी बुध्दीबळ कोच वैभव जैन यांनी मार्गदर्शन केले.
 स्पर्धेचा समारोप 10 जुलै रोजी मॉडेल इंग्लीश स्कुल परभणी येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यख बध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष श्री राके सर हे होते तर प्रमुख पाहुणे पाहुणे म्हणुन सचिव बिल्पे सर, कांकरिया सर, श्री पोटकर सर, शेलगावकर, उपप्राचार्य मेणे सर सर्वानी स्पर्धेत विजेता व सहभागी विद्यार्थ्यांचे मेडल व प्रमाणपत्र देवून कौतूक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कांकरिया सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन राके सर यांनी मानले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा बुध्दीबळ असोसिएशन च्या सर्व पदाधिकारी व खेळाडूंनी परिश्रम घेतले. या स्पर्धेत मोठ्या  संख्येने, विद्यार्थी, खेळाडू सहभागी झाले होते.