Breaking News

जीवनावश्यक वस्तूंच्या साठेबाजीवर शासनाची मार्यादा

सातारा, दि. 14 (प्रतिनिधी) - केंद्र शासनाने दि. 28 सप्टेंबर 2015 रोजीच्या अधिसूचनेद्वारे डाळी, खाद्य व खाद्य तेलबिया दि. 30 सप्टेंबर 2016 पर्यंत साठा निर्बंध लागू केले आहेत. त्यास अनुसरुन राज्यात डाळी, खाद्यतेल, खाद्य तेलबिया यावर दि. 30 सप्टेंबरपर्यंत व साखरेवर दि. 25 ऑक्टोबर 2016 पर्यंत साठा निर्बंध लागू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी दिली.
त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सर्व घावूक व किरकोळ व्यापार्‍यांना शहराच्या वर्गवारीनुसार पुढीलप्रमाणे साठा निर्बंध लागू राहील. साठा मर्यादा क्िंवटलमध्ये :- डाळी महानगरपालिका क्षेत्र घाऊक 3500, किरकोळ 200, अ वर्ग नगरपालिका घाऊक 2 हजार 500 किरकोळ 150, इतर ठिकाणी 1 हजार 500, किरकोळ 150.
खाद्यतेल बिया टरफल असलेल्या शेंगदाण्यासह महानगरपालिका क्षेत्र
घाऊक 20 हजार, किरकोळ 2 हजार. इतर ठिकाणी घाऊक 8000 व किरकोळ 2 हजार. शेंगदाणा अथवा बियांसाठी निश्‍चित केलेल्या 75 टक्के मर्यादा लागू राहील. खाद्यतेल वनस्पती तेलासह सर्व खाद्यतेल महानगरपालिका क्षेत्र घाऊक 1 हजार, किरकोळ 40, इतर ठिकाणी घाऊक 300 व किरकोळ 20 तसेच साखर घाऊक 5 हजार व किरकोळ 500 क्िंवटल. जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी व काळा बाजारास आळा बसावा या दृष्टीकोनातून कडक कार्यवाहीच्या अनुषंगाने साठा निर्बंधापेक्षा जास्तीचा साठा आढळून आल्यास संबंधित व्यापार्‍यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी सांगितले आहे.