Breaking News

तलावात बुडून पर्यटकाचा मृत्यु

लोणावळा, दि. 05 - लोणावळा शहरापासून काही अंतरावर असलेल्या गिधाड तलाव परिसरात सोमवारी सकाळी फिरायला आलेल्या एका पर्यटकाचा तलावात बुडून मृत्यु झाला. आज दुपारी 1:30 वाजता सदर इसमाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्कू टिमला यश आले आहे. सोमवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. सिरिल थाँमस किनी असे मृत तरुणाचे नाव आहे.