Breaking News

खडकवासला धरणात 43 टक्के पाणी

खडकवासला, दि. 05 - पुणे शहर परिसरातील धरण क्षेत्रात मंगळवारी पावसाची संततधार सुरू असल्याने पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे. मंगळवारी खडकवासला धरणात 43 टक्के पाणीसाठी जमा झाला असून, धरण लवकरच निम्मे भरणार आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोमवारपासून पावसाचा जोर ओसरला आहे. असे असले तरी मागील चार दिवसात पडलेल्या पावसामुळे ओढे ओहोळ यांना चांगले पाणी असून त्यामुळे पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे. टेमघर धरणातील पावसाने 628 मिमी पाऊस झाला आहे.