Breaking News

विद्यार्थ्यांमध्ये अशा उपक्रमातून येते गुणवत्तेची उर्जा - ना.मुंडे

बुलडाणा (प्रतिनिधी), दि. 12 - गरीब व गरजू मुलांमध्येही प्रचंड बौध्दीक उर्जा असते, परंतु शालेय साहित्य अभावी कधी-कधी त्यांना शिक्षणच सोडावे लागते. त्यामुळे सामाजिक भान ठेवून दत्ता काकस यांनी शालेय साहित्य वाटपाचा राबविलेला उपक्रम, विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची उर्जा निर्माण करणारा असल्याचे प्रतिपादन ना.धनंजय मुुंडे यांनी केले.
स्थानिक राजे लॉन्समध्ये सोमवार 6 जुलै रोजी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वखर्चातून दत्ता काकस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्याहस्ते 500 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे होते तर यावेळी मंचावर राकॉ.जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी व कार्याध्यक्ष संगीतराव शेंगळ होते. याप्रसंगी माजी मुख्याध्यापक व क्रिडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यात देशमुख सर, साबळे सर, धोरण सर, श्ुसारी सर, वाघमारे सर, विष्णुपंत पाटील यांचा समावेश होता. डॉ.शिंगणे यांनी यावेळी दत्ता काकस यांचे आजवर केलेल्या सर्व कार्यक्रमांचा व सामाजिक कामाचा पक्ष बाजुला ठेवून केलेल्या समाजकारणाचे कौतूक केले व ते असेच सदैव जनतेची मदत करत राहतील व पक्ष बळकट करण्याच काम करत राहतील, असा आशावाद व्यक्त केला. सुत्रसंचालन रणजितसिह राजपूत यांनी केले व आभा र प्रदर्शन अजय खोत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कांताभाऊ चव्हाण, संजय निकम, गजानन कोरके, श्याम घाटे, भगवान व्यवहारे, अशोक वावरे, सत्तार कुरेशी, संदीप सोनुने, संजय खाकरे, उमेश देशमुख, किशोर सुरुशे, यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले.