जिल्ह्यात संततधार; खामगांव, नांदुरा तालुक्यात अतिवृष्टी
बुलडाणा, दि. 12 - जिल्ह्यामध्ये शनिवारपासून सुरू झालेली पावसाची संततधार कायम असून आज सोमवारलाही जिल्ह्यात पावसाने झड लावली होती. त्यामुळे जनजीवनावर काहीसा परिणाम जाणवत होता. संततधारेमुळे ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीची कामेही बंद होती. रविवार व सोमवारला सकाळी काही भागात, तर दुपारी काही ठिकाणी पावसाचा वेग वाढला होता. जिल्ह्यात नांदुरा व खामगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकूण 696 मि.ली पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 5
3.5 मि.ली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस लोणार तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस जळगाव जामोद तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2016 पासून आतापर्यंत पडलेलया पावसाची सरासरी 240.8 मि.मी आहे.
जिल्ह्यात 11 जुलै 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद खालीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची बुलडाणा : 58 मि.ली (250 मि.ली), चिखली : 32 (180), दे.राजा : 47 (319), मेहकर : 40 (272), लोणार : 43 (327), सिंदखेड राजा : 60 (324.7), मलकापूर : 41 (197), मोताळा : 57 (219), नांदुरा : 72 (232), खामगांव : 67 (215.2), शेगांव : 62 (229), जळगाव जामोद : 54 (172) आणि संग्रामपूर : 63 (193 मि.ली) पावसाची नोंद करण्यात आली.