Breaking News

कापरी नदी रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर

। ग्रामस्थांच्या लोकसहभागातून कापरी नदीपात्राच्या सुमारे दोन कि.मी. रुंदीकरण व खोलीकरणाचे काम 

भाळवणी (प्रतिनिधी) । 15 - गेल्या एक महिन्यापासून येथील कापरी नदीच्या पात्राचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. कृषी विभागाची जलयुक्त शिवार योजना तसेच ग्रामस्थांच्या लोकसहभागातून येथील कापरी नदीपात्राच्या सुमारे दोन कि.मी. रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी तीन बंधार्‍यांच्या माध्यमातून पाणी अडवलेले आहे.त्यापैकी एक जुना बंधारा दुरुस्तचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे लोकसहभाग योजनेचे मार्गदर्शक आबासाहेब चेमटे यांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी श्री.दरेकर यांना या नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बंधारे बांधण्यासाठी पाहणी करण्यास सूचना केल्या. नुकतीच पारनेर- श्रीगोंद्याचे प्रांताधिकारी संतोष भोर यांनी या कामाची पाहणी केली. गावच्या हद्दीतील संपूर्ण नदीपात्र रुंद व खोल होत असल्यामुळे येथे मोठा पाणीसाठा होऊ शकतो, हे लक्षात आल्यामुळे त्यासंदर्भात त्यांनी योग्य त्या सूचना ग्रामस्थांना केल्या. सुमारे तीन तास त्यांनी या कामाची पाहणी केली. यादरम्यान येथील तलाठी व सर्कल ऑफिसच्या जागेअभावी प्रलंबित असलेल्या जागेची पाहणी केली. येथील नागेश्‍वर सामाजिक प्रतिष्ठाणच्या माध्यमातून गावच्या विविध भागात केलेल्या वृक्षलागवडीचीही पाहणी करून समाधान व्यक्त केले. या वेळी नदीपात्रातील रुंदीकरण पाहून समाधान व्यक्त केले व तालुक्यातील सर्वात मोठे काम होत असून, हे काम अत्यंत दिशादर्शक पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले. या वेळी पंचायत समिती सदस्य गंगाराम रोहोकले, सरपंच बबन चेमटे, पी.एस.आय.आबासाहेब चेमटे, संदीप कपाळे, अशोक रोहोकले, पत्रकार संपत कपाळे, सामाज़िक बांधकामचे उपअभियंता अजयकुमार सर्वगोड, ग्रामविकास अधिकारी संपतराव दातीर, कामगार तलाठी, प्रभाकर रोहोकले, प्रशांत उपाध्ये, नागेश्‍वर सामाजिक प्रतिष्ठाणचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.