Breaking News

शेतकर्‍यांनी बंद पाडला लिलाव

औरंगाबाद, दि. 15 - कांद्याचा घसरलेला भाव व सहा टक्के आडतीमुळे गुरुवारी वैजापूर येथील कांदा मार्केटमध्ये शेतकर्यांनी लिलाव बंद पाडला. यावेळी संतप्त झालेल्या शेतकर्यांनी नागपूर - मुंबई महामार्गावर कादे टाकून आपल्या भावना व्यक्त करीत निषेध केला. तसेच खरेदीदारांकडून सहा टक्के आडत घेण्यात येत असल्याने हा कांदा कोणीच घेतला नाही. परिणामी कांदा मार्केटमध्ये गुरूवारी जवळपास एक हजार गोणी कांदा तसाच पडून राहिला.
वैजापूर शहरालगतच्या घायगावनजीक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये जाहीर लिलाव पद्धतीने कांदा खरेदी केली जातो. गुरूवारी मार्केटमध्ये एक हजार कांदा गोणीची आवक होती. यापूर्वी कांदा विक्रीसाठी आणणार्या शेतकर्यांकडून सहा टक्के आडत वसूल केली जात असे.