अमळनेरात तरुणाची आत्महत्या
जळगांव, दि. 15 - येथील ज्ञानेश्वर कॉलनीतील रहिवाशी एका 33वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि. 14 रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडली असून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर कॉलनीतील रहिवाशी ज्ञानेश्वर भगवान चौधरी (वय 33) याने राहत्या घरी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास गळफास घेतला. त्यानंतर त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एकमुलगा, एक मुलगी असा परिवार होत.