Breaking News

महिलांच्या प्रलंबित प्रश्‍नावर तातडीने निर्णय घेणार ः महापौर सुरेखा कदम

अहमदनगर, दि. 18 - गेल्या अनेक दिवसांपसून काही प्रश्‍न प्रलंबीत आहे. तसेच खड्यांचा प्रश्‍नही प्रलंबीत आहे. यासाठी तातडीने बैठक नुकतीच महापौर सुरेखा कदम यांनी घेतली यामध्ये त्यांनी बोलताना सांगीतले की, सर्व प्रश्‍नांवर मार्ग काढून तातडीने मिळवण्याचा आपला प्रयत्न राहणार असुन सर्वांना बरोबर घेवून काम करणार आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत महिला नगरसेविकांनी प्रभागातील  विविध समस्या मांडल्या, कचरा रोज उचलला जावा यावरही चर्चा करण्यात आली, नियमित साफसफाई व्हावी. पिण्याचे पाणी वेळेत व पुरेसे मिळावे, रस्ते चिखलमय झाल्याने मुरुम टाकावा. पथदिवे दुरुस्तीचे काम रखडले आहे. पिण्याचे पाणी पुरेसे मिळावे, याबाबत व्हॉल्व्हमनला सूचना द्याव्यात, अशा अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आल्या. यावेळी महापौर कदम यांनी त्या सोडविण्याचे आश्‍वासन सर्वांना दिले आहे. तसेच महिला नगरसेविकांच्या प्रभागातील अडचणी जाणून घेवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी महापौर सुरेखा कदम यांनी बोलविलेल्या बैठकीला भाजपसह विरोधी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेविकांनी दांडी मारली. महापौरपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महापौर सुरेखा कदम यांनी दर महिन्याच्या दुसर्‍या सोमवारी महिला नगरसेविकांची बैठक आयोजित करण्याची घोषणा केली होती. महिला नगरसेविकांच्या प्रभागातील समस्या जाणून घेणे आणि त्यावर विशेष लक्ष देवून उपाययोजना आखणे असा बैठकीचा उद्देश होता. त्यादृष्टीने कदम यांनी सोमवारी (दि.11) सायंकाळी पाच वाजता ही बैठक बोलविली होती. महापौर कार्यालयातून सर्वच नगरसेविकांना निरोप देण्यात आले. मात्र, या बैठकीसाठी केवळ आठच नगरसेविका उपस्थित होत्या. त्यामध्ये शिवसेनेच्या शारदा ढवण, छाया तिवारी, अपक्ष नगरसेविका सारिका भुतकर, उषा ठाणगे यांचा समावेश होता.