पुणेरी पलटणचा पराभव तर पायरेट्स अव्वल स्थानी
कोलकाता, दि. 18 - प्रो कबड्डी लीगमध्ये रविवारी झालेल्या कोलकाता लेगच्या दुसर्या दिवशी जयपूर पिंक पँथर्सने बलाढ्य समजल्या जाणार्या पुणेरी पलटणला पराभवाचा धक्का दिला. तर दुसर्या लढतीत पटना पायरेट्सने बंगाल वॉरियर्सचा पराभव करून अंक तालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. पूर्णपणे तंदुरूस्त नसतानाही मनजित चिल्लरला खेळवण्याचा निर्णय पुणेरी पलटण संघाच्या चांगलाच अंगलट आला. प्रो कबड्डी लीच्या चौथ्या हंगामातील कोलकाता टप्प्यात रविवारी जयपूर पिंक पँथर्सने 33-27 अशा फरकाने पुण्याचे आव्हान सहज परतवले. सलग दोन पराभवानंतर पँथर्सने दमदार पुनरागमन करून हा विजय मिळवला. पहिल्या सामन्यात पुण्यावर दोनदा लोण चढवत जयपूरने वर्चस्व गाजविले.
दरम्यान दुसर्या सामन्यात अतितटीची लढत पाहवयास मिळाली. बंगाल वॉरियर्सविरुद्ध प्रदीप नरवालने दोन चढाईत 5 गुणांसह लोणचे दोन गुण कमावल्यामुळे 31 व्या मिनिटापर्यंत 18-18 अशा बरोबरीत असलेल्या सामन्यात पाटणा पायरेट्सने 25-19 अशी आघाडी घेतली. प्रदीपची ही चढाई पाटण्याच्या 33-27 अशा विजयात महत्त्वाची ठरली, तर या पराभवामुळे बंगालचे आव्हान जव्पळपास संपुष्टात आले. अटीतटीच्या या लढतीत जँन कून लीने चढाईत दोन गुण पटकावून चुरस निर्माण केली, परंतु त्याला विजय मिळवण्यात अपयश आले. पाटण्याच्या विजयात प्रदीपसह (9) सुरजित सिंग (6) याने पकडीत, तर राजेश मोंडल व फाझेल अत्राचाली यांनी प्रत्येकी तीन गुण कमावत चोख भूमिका बजावली.