Breaking News

प्रभाग 21 मध्ये बंद पाईप गाटरीच्या कामाचा शुभारंभ

अहमदनगर, दि. 18 - आशा टॉकीज परिसरात पाणी साठत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आपण येथे बंद पाईप गटारीचे काम सुरू केले. हे काम झाल्यानंतर परिसरात स्वच्छता राहील. पाणीही साठणार नाही. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत व राहू, असे प्रतिपादन स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले यांनी केले.
प्रभाग 21मधील आशा टॉकीज येथे स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले यांच्या प्रयत्नातून बंद पाईप गटारीच्या कामाचा शुभारंभ राजेंद्र चावला यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. डागवाले बोलत होते. याप्रसंगी स्थायीचे माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी, महंमद उमर, महंमद इस्माइल, रईस महंमद, रोहन डागवाले, विशाल भालेराव, केदारे, कैलास थोरात, जावेद शेख, मकसूद शेख, राजा सौदागर, असलम शेख, साबीर शेख, नदीम शेख, तय्यब शेख, अकील शेख, मुबिन खान, हाजी शफी, अजहर मकसूद आदी उपस्थित होते. डागवाले पुढे म्हणाले की, आशा टॉकीज परिसरात अनेक व्यावसायिकांची दुकाने असून, ते व्यवसाय करीत आहेत. पाणी साठल्यामुळे व सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम होत होता. त्यामुळे येथे बंद पाईप गटारीचे काम सुरू केले. प्रभागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा मिळाव्यात, याकडे आपले नेहमीच लक्ष असते. सर्वांना बरोबर घेऊन काम करीत असल्याने नागरिक आपल्याबरोबर आहेत.
राजेंद्र चावला म्हणाले की, श्री. डागवाले यांनी प्रभागाच्या विकासाबरोबरच इतर सामाजिक उपक्रम आयोजित करून नागरिकांना एक चांगली पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. सण, उत्सव सर्र्वांना एकत्र घेऊन ते साजरे करतात.