Breaking News

अवैध आंबा लाकडाची तस्करी करणारा ट्रक वनविभागाच्या जाळ्यात

बुलडाणा, दि. 10 - अवैध आंब्यांच्या लाकडाची तस्करी करणारा ट्रक वनविशगाच्या कर्मचा-यांनी हातणी ते रायपुर रस्त्यावर पकडला. ही घटना 9 जुलैच्या रात्री 3 च्या दरम्यान घडली.
सहायक वनसंरक्षक संरक्षण बुलडाणा कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी हे मिळालेल्या गुप्त माहिनीनुसार हातनी ते रायपुर रस्त्यावर नाकेबंदी करुन थांबले असता अंदाजे 3 वाजेदरम्यान एक ट्रक हातणी गावाकडून सातगाव भुसारी गावाचे रस्त्याने येत असलेला दिसता. सदर ट्रकला वनाधिकारी कर्मचारी यांनी हात देवून थांबविला असता वाहनचालक शेख शाकिब शेख मोबीन, रा.फर्दापूर, ता.सोयगाव जि. औरंगाबाद यांनी सदर ट्रकमध्ये आंब्याची लाकडे भरलेली असल्याचे सांगितले. सदर लाकडे ही कालेखाँ अब्दुल खॉ पठाण, औरंगाबाद यांचे मालकीची असल्याचे सांगितले. ट्रक हा शाकिर बेग शब्बीर बेग, रा. धाड ता.जि.बुलडाणा यांचे मालकीचा असुन ट्रकचा क्रमांक एमएच28-एबी-8989 असल्याचे त्यांनी सांगितले. सदर आंबा लाकडांचे तोडण्याचे तसेच वाहतुकीबाबतचे परवानगीचे कागदपत्रांबाबत विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची वृक्षतोडीची तसेच वाहतुकीची परवानगी नसल्याचे वाहनचालक यांनी सांगितले. आंबा हा अनुसूचित प्रजातीचा वृक्ष असल्याने विनापरवाना तोड करणे व विनापरवाना वाहतुक करणेचा वन गुन्हा घडल्यामुळे भरतीय वन अधिनियम, 1927 चे कलम 41,42,52 1, महाराष्ट्र वननियमावली, 2014 चे नियम 311 आणि महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम, 1964 चे नियम 3,4 चे उल्लंघन झाल्याने सदर वाहन हे लाकडांसहित ताब्यात घेवून वनविभागाचा वन गुन्हा क्रमांक 679/20 दि. 9/07/2016 जारी करण्यात आला. वनगुन्ह्यामध्ये एकूण 47 आंबा लाकडे, 21.382 घमी, किंमत रु. 1,71,526/- व ट्रक क्रमांक एमएच-28-एबी-8989 किंमत अंदाजे 12 लाख असा एकूण रु. 13,71,526 रु. इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई ही बी.टी.भगत, उपवनसंरक्षक बुलडाणा आणि व्ही.ए.राठोड, सहाय्यक वनसंरक्षक संरक्षण बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली संरक्षण पथकाचे पथकाचे अधिकारी पी.एम.बुटे, वनपाल, पी.डी.सावळे, वनपाल, सतिश इंगळे, वनरक्षक , सुभाष गवई, पोलिस नाईक, संदिप मडावी, वाहनचालक यांनी पार पाडली.