नापिकी अनुदानाचे तात्काळ वाटप कराः काँग्रेस
बुलडाणा, दि. 10 - मागील वर्षी झालेल्या अल्प पावसामुळे प्रमुख पिक असलेलेे तुर व सोयाबीन चे अत्यंत कमी उत्पन्न शेतक-यांना झाले. नापिकीचे पैसे शासनाच्या वतीने देण्यात येणार या आशेवर शेतकरी अंवलबुन आहेत, पंरतू अद्यापही पैस न मिळाल्याने त्रस्त झालेल्या डासाळा येथील शेतक-यांनी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्याकडे नापिकीचे अनुदान मिळण्यासाठी विनंती केली होती. याचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार बोंद्रे यांनी काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भसारी व तालुका सरचिटणीस जितेंंद्र मुळाकर यांच्यासह डासाळा व परिसरातील शेतक-यांसह तहसिलदारांना निवेदन दिले. व तात्काळ अनुदान वाटप करण्यची मागणी केली.
चिखली तालुक्यातील मौजे डासाळा येथील शेतक-यांचे नापिकीचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. जवळपास 50 शेतक-यांचे अनुदान न मिळल्याने शेतकरी व वारंवार तलाठी, बँक व तहसिल कार्यालयात वारंवार चकरा मारून देखील अद्यापही अनुदानाचे वितरण करण्यात आले नाही. यामुळे सदर शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून त्यांच्या या अवस्थेला जबाबदार असणा-या म्हणजेच नापिकीचे अनुदान देण्यास हलगर्जी करणा-या कर्मचा-यांवर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी आज तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसिलदारांना निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, सरचिटणीस जितेंद्र मुळावकर, त्रंबक दुधाळे, रूख्मीणीबाई दुधाळे, नारायण पुंड, श्रीकृष्ण पुंड, रामराव पैठणे, शंकर जाधव, दिपक मंगलचंद बेलोकर, मनिषा दिपक बेलोकर, सचिन बेलोकर,नारायण यादव याच्यासह डासाळा येथील शेतकरी उपस्थित होते.