अल्पसंख्यांक विकासाअंतर्गत शाळांसाठी 12 कोटींचा निधी
बुलडाणा, दि. 10 - केंद्र पुरस्कृत बहूक्षेत्र विकास कार्यक्रमांअंतर्गत जिल्ह्यातील खामगांव, बुलडाणा, शेगांव व चिखली गटामध्ये अल्पसंख्यांक विकास विभागांकडून शाळा अद्यावत करण्यासाठी 12 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने हा निधी मिळाला आहे.
शालेय इमारत, अंगणवाडी, प्रशिक्षण हॅल, कॉम्प्युटर रुम, वसतीगृह, स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा कक्ष अन्य सुविधा या निधीतून उभ्या करता येणार आहे. अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाकडील अप्पर सचिवांच्या पत्राने पहिल्या टप्प्यांचा केंद्र शासनाचा 8 कोटी रुपये निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे वितरीत करण्यात आला आहे. 12 व्या पंचवार्षीक योजनेत केंद्र शासनाच्या अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाकडे याबाबत खा.प्रतापराव जाधव यांनी पाठपुरवा केला होता.
राज्यातील बुलडाणा जिल्ह्यासह वाशिम, हिंगोली, यवतमाळ, परीाणी, जालना, लातूर, बीड अशा 9 जिल्ह्यातील 8 गट व 6 शहरांची यात निवड करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्याकरीता यामध्ये 8 कोटी 3 लक्ष 67 हजार 500 रुपयांचा पहिला टप्प्यातील निधी जिल्हाधिकार्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.चार गटापैकी खामगांव मधिल माथनी, तांदुळवाडी, निळेगांव, धारोडा, आकोळी, पिंपळगांव राजा, झोडगा, टाकळी तलाव, लोपाकाजी, खुटपूर्ती, सजनपूरी, आडगांव, चितोड, मांडणी, गेरू, बोरी, गर्व्हमेंट पॉलीटेक्नीक खामगांव यांचा समावेश आहे. बुलडाणा गटात देऊळघाट, धाड, रायपूर, तर शेगांव मधील माटरगांव, वरुड, कासुरा, कालखेड,गोळेगांव, करणखेड, आळसणा, महागाव शिरसगांव निळे, तरोडा कसबा यांच्यासह गर्व्हमेंट आयटीआय मध्ये कामे होतील. त्याप्रमाणे चिखली गटातील ब्रम्हपूरी, तांदुळवाडी अमडापूर मेरा खू अंबाशी, रोहणा, गिरोळा, बोरगांव वसू, डोंगरशेवली, रानअंत्री, खामखेड या गावांमध्ये या निधीतून कामे होणार आहे. येत्या वर्षभरात सदर कामे मार्गी लागत