Breaking News

पाकची इंग्लडवर मात

लंडन, दि. 18 - कसोटी क्रिकेटमध्ये बलाढ्य समजल्या जणार्‍या इग्लंडला पाकिस्ताने इंग्लडच्या घरच्या मैदानात पराभवाचा धक्का देत क्रिकेट विश्‍वात खळबळ उडवून दिली. गोलंदाजांच्या सुरेख एकत्रित कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत थरारक विजय मिळवला. चौथ्या दिवशी पाकिस्तानने इंग्लंडसमोर 283 धावांचे आव्हान ठेवले. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सातत्याने विकेट्स पटकावत संघाला एक दिवस राखूनच शानदार विजय मिळवून दिला. सामन्यात दहा विकेट्स घेणारा फिरकीपटू यासिर शाह या विजयाचा शिल्पकार ठरला.