Breaking News

लिटील फ्लॉवर नर्सरी स्कूलच्या चिमुकल्यांनी घेतला झाडे लावण्याचा वसा

अहमदनगर, दि. 09 - लहान मुलांना पाण्याचे महत्व सांगून आपणाला पाणी कशाप्रमारे मिळते याचे मुलांना त्यांच्या भाषेत स्पष्टीकरण दिले. पाणी हवे असेल तर झाडे लावलीचं पाहिजे. फक्त वृक्षारोपण करुन उपयोग नाही तर आपण लावलेली झाडे कशी वाढवता येतील याचाही विचार आपण करायला पाहिजे. वृक्षतोड थांबवली पाहिजे, असे प्रतिपादन लिटील फ्लॉवर  शाळेच्या संचालिका सौ.मनिषा बोगावत यांनी केले.
इमारत कंपनी येथील लिटील फ्लॉवर नर्सरी स्कूलच्या प्ले ग्रुप व नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी पालकांसमवेत गंगा उद्यान येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी साजन सजनीचे शेखर भंडारी, सौ.साधना कोठारी, राजू देवराईकर आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना सौ.बोगावत  म्हणाल्या, आपण आपली मुले ज्या पद्धतीने वाढवतो, अगदी त्याच प्रकारे आपण झाडांवरही प्रेम करायला पाहिजे. असे जर प्रत्येकाने केले तर पुढील काळात आपण भीषण दुष्काळापासून नक्कीच बाहेर पडू, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शाळेतील मुलांना श्री.भंडारी यांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी शिक्षिका सौ.राधिका कल्याणी, सौ.केतकी परदेशी, सौ.कविता गोंडम, सौ.मेहेरीन खान, कु.दिया कोठारी, कु.तसिन काझी आदिंचे सहकार्य लाभले. यावेळी पालकांनीही आपल्या चिमुकल्यासह वृक्षरोपण केले.